नेरी पोलिसांनी काजळसर मोटेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या आवळल्या मुसक्या 2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त

0
573

नेरी पोलिसांनी काजळसर मोटेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या आवळल्या मुसक्या
2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त

खोब्रागडे

नेरी वरून जवळ असलेल्या काजळसर मोटेगाव जंगलात नेरी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यां विरुद्ध धडक मोहीम राबवित मोठी कारवाई करीत आरोपी सहित 2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त करीत अवैध दारू विक्रेत्यांना दणाणून सोडले आहे
आज दिनांक 04/05/2021 मा. पोलिस निरिक्षक श्री. रविंद्र शिंदे सा. यांचे मार्गदर्शनामध्ये पो उप निरीक्षक राजू गायकवाड यांच्या नेतूत्वाखाली मागील सात दिवसापासून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध अनेक कारवाई करीत त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत आतापर्यंत लाखो रुपयांचा माल जप्त करीत अवैध दारू विकर्त्यांना पळता भुईसपाट केले आहे आणि आज मौजा मोटेगाव – काजळसर जंगल शिवारात पाहिजे असलेले आरोपी नामे दिपक दुधे, व राष्ट्रपाल गेडाम, दोन्ही रा. मोटेगाव, ता. चिमूर यांनी अवैधरीत्या देशी दारू विक्रिचे उद्देशाने लपवून ठेवली असल्याचे खात्रीशीर मुखबिराचे खबरेवरुन दारूबंदी बाबत कार्यवाही केली असता ११नग खर्ड्याच्या खोक्यात प्रत्येकी ४८ नग प्रमांणे ५२८नग कोकण देशी दारु संत्रा ९९९, प्रती २५०रु. प्रमाणे. किं. १,३२,०००रु.,तीन नग प्लास्टिक चुंगळीत ३००नग प्रमाणे ९००नग प्रत्येकी ९० मिली. मापाच्या रोकेट देशी दारु संत्रा प्रती १५०रु. प्रमाणे १,३५,०००रू. तसेच एका खर्ड्याचे खोक्यात १००नग प्रत्येकी ९०मिली. मापाच्या रोकेट संत्रा देशी दारुने भरलेल्या, किं. १५,०००रु. असा एकूण २,८२,०००रु. चा माल मिळून आला. नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध रितसर गुन्हा नोंदविण्यात येत असून सदरची कार्यवाही पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत पोलीस चौकी नेरी येथील पो.उप.नि. राजु गायकवाड, NPC/20, दिनेश सूर्यवंशी, PC/2565, सचिन साठे, चालक PC/808, शरीफ शेख, सैनिक 1396, 1470 यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.पोलीस विभागाच्या या कारवाई मूळे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here