आयटक संघटनेकडून आशा व गतप्रवर्तिकांचा राज्यव्यापी संप

0
417

आयटक संघटनेकडून आशा व गतप्रवर्तिकांचा राज्यव्यापी संप

कोविड-19 सर्वे चा न-मिळालेला प्रोत्साहन भत्ता द्या, व कपात केलेले पैसे पुर्ववत सुरु करा

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती/धारणी :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील आशा वर्कर यांना 17 जुलाई 2020 च्या शासन निर्णया नुसार दरमाहा रु. 2000/- तर गतप्रवर्तिका यांना रु. 3000/- मानधन देण्याची अंमलबजावणी त्वरित करा, व कोविड-19 च्या सर्वेक्षणसाठी (शासन मंजूर) प्रतिदीन 300/- रुपये मोबदला देण्यात यावा, तसेच गतप्रवर्तकांचे कपात केलेले टी ए 625 व डेटा एंट्री 250 असे एकुन 875/- रुपये पूर्ववत लागू करा.
या प्रमुख मागण्यांसमवेत शासनाच्या ग्राम विकास खात्याकडून ३१मार्च २०२० रोजी.
“कोविड-19 मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन भत्ता ( मानधना व्यतिरिक्त रुपये 1000/- )”देण्यात यावे असे परिपत्रक काढण्यात आलेले असूनही जिल्हा प्रशासनाने त्याच्या दक्षता न घेता त्याचा चुकीचा अर्थ लावून माहे एप्रिल ते ऑगस्ट पर्यन्त काम करून सुद्धा फक्त एकच वेळा 1000/- रुपये दिलेत आहेत व काहिंना तर अजूनही ते दिलेले नाहीत. आणि पुनः निर्णयाला मुदत वाढ देण्यात कोरोना संपल्या नसल्यामुळे ३१ मार्च पासून फकरबिलाची रक्कम त्वरित द्या, इत्यादि मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य आशा वर्कर व गतप्रवर्तक संघटना ( आयटक ) च्या वतीने आज दिनांक 21 सेप्टेंबर रोजी पासून आशा व गतप्रवर्तिकांचा बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वरील मागन्यांवर अंमलबजावणी व्हावी करिता संघटनेच्या वतीने वरिष्ठान्ना याआधी वारंवार निवेदने करण्यात आलेली होती तरीही त्यांनी त्यावर हलगरजी पना करत कोणताही निर्णय देने व या मागण्या पूर्ण करने गरजेचे समजले नाही. करिता नाइलाजास्ताव या संपाचा निर्णय घेण्यात आला.

आशा व गतप्रवर्तिकांच्या मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्यात व त्या पूर्ण होइस्तोवर हा संप सुरुच राहिल असे निवेदनही आरोग्य खात्याचे अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी अम., विभागीय आयुक्त आम., अमरावती महानगरपालीकेचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी अम. , पोलिस अधीक्षक अम., तसेच मुख्याधिकारी नगर पंचायत धारणी, तहसीलदार धारणी, तालुका आरोग्य अधिकारी धारणी, व ठाणेदार पोलिस स्टेशन धारणी यांना देण्यात आले.

हे निवेदने महाराष्ट्र राज्य आशा वर्कर व गतप्रवर्तक संघटना आयटक चे धारणी तालुका पदाधिकारी सुरेश मनवर यांच्या नेतृत्वात व गतप्रवर्तिका विजया मनवर , गप्र. मीना कासदेकर, गप्र. संध्या जावरकर, गप्र. चारू वानखडे, गप्र. कलावती भिलावेकर, गप्र. राधा धांडे, गप्र. शकुंतला धांडे, सोबतच आशा द्रौपदी बेठेकर व इतर सर्व आशा उपसस्थितित देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here