आवाळपुर येथील गरजवंतासाठी 500, व कोल्हापूर गुडया करिता 100 धान्यांची किट द्याव्या

0
469

आवाळपुर येथील गरजवंतासाठी 500, व कोल्हापूर गुडया करिता 100 धान्यांची किट द्याव्या

उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांची अल्ट्राटेक प्रशासनाकडे मागणी

आवाळपुर, नितेश शेंडे : मागील अनेक दिवसांपासून राज्यभर कोरोना संकट वाढत असून कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यभर लॉकडॉऊन घोषित केले. लॉकडॉऊन मुळे जे लोक रोजनदारीवर जाणाऱ्या लोकांना याची मोठी झळ पोहचली. ना रोजगार उपलब्ध ना प्रशासनाकडून कुठलीही मदत म. दोन वेळेस च्या अन्नाकरिता सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. हीच परिस्थिती कोरपना तालुक्यात सुद्धा आहे.
कोरपना तालुक्यातील आवाळपुर येथे सुद्धा परिस्थिती भीषण आहे. कोरपना तालुक्यात सर्वात जुना असा अल्ट्राटेक सिमेंट उद्योग आहे.अल्ट्राटेक कंपनीच्या सी.आर. सी फंडाअंतर्गत या आवाळपुर परिसरात कठीण परिस्थितीत नेहमी मदत केल्या जाते. सध्या परिसरात कोरोनामुळे मोठं संकट आहे. याच परिस्थितीचा विचार करून आवाळपुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आवाळपुर येथील गरजवंतासाठी 500 व आदिवासी बागुल कोल्हापूर गुडया करिता 100 धान्यांची किट देण्याची मागणी अल्ट्राटेक प्रशासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here