येत्या १२आँक्टाेबरला जिल्ह्यातील हजाराें !उमेदच्या! महिलांचा रास्त मागण्यांसाठी चंद्रपूरात मुक माेर्चा !

0
545

येत्या १२आँक्टाेबरला जिल्ह्यातील हजाराें !उमेदच्या! महिलांचा रास्त मागण्यांसाठी चंद्रपूरात मुक माेर्चा !

किरण घाटे:- रास्त मागण्यां पदरात पाडुन घेण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों कार्यरत उमेदच्या महिलांनी मुक माेर्चाचे आयोजन केले आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हा माेर्चा दुपारी धडकणार असुन एका लेखी निवेदनातुन शासनाचे लक्ष (आपल्या रास्त )मागण्यांकडे वेधणार असल्याची माहिती आयाेजकांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेतुन दिली आहे .दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिराेलीत जिल्ह्यात सुध्दा या मुक माेर्चाचे आयोजन करण्यांत आले आहे .🟢🌼हा मुक माेर्चा येत्या (साेमवारला) १२आँक्टाेबरला चंद्रपूरात आयोजित करण्यांत आला असुन उमेदच्या तीन ते चार हजार महिला( या माेर्चात )सहभागी हाेत असल्याची माहिती आहे .सदरहु माेर्चात उमेदच्या महिलांनी माेठ्या संख्येने सहभागी हाेण्यांचे आवाहान उमेद अभियान , व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या एका प्रसिध्द पत्रकातुन करण्यांत आले आहे .महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला उन्नती देणां-या उमेदला बाह्य संस्थेकडे देण्यांच्या हालचाली जलदगतीने सुरु झाल्या आहे . राज्यभरातील उमेदच्या दहा ते बारा लाख महिला याच दिवशी मुक माेर्चा काढणार असल्याची माहिती आहे .या संस्थेच्या अभियानशी चंद्रपूर जिल्ह्यातील दाेन ते अडीच लाख महिला (उमेदशी) जुळल्या असल्याची माहिती उमेदच्या एका महिला सदस्यांनी इम्पँक्ट- २४न्यूज चैनलच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना आज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here