सदैव धडपडणारा विशाल शेंडे ठरला राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी !

0
494

सदैव धडपडणारा विशाल शेंडे ठरला राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी !

अनेकांनी केले त्याचे कार्यांचे ताेंडभरुन काैतुक!

किरण घाटे:-राजूरा येथील स्थानिक शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक विशाल शेंडे यांनी गावामध्ये अनेक उपक्रम राबविले. विशाल शेंडे याने राज्यस्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन केले.
वरूर रोड येथील विशाल शेंडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गावामध्ये सामाजिक , शैक्षणीक, सांस्कृतिक असे इत्यादी नानाविध उपक्रम राबविले आहे . विशालने युवा मित्राच्या सहकार्याने गावामध्ये सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली. आणि गावातून दहा हजारांची निधी गोळा करून पुस्तके उपलब्ध केली.. त्यानंतर वाचनालयात अनेक विद्यार्थी येऊ लागले. जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय असे वाचनालयाचे नाव देण्यात आले. विशालने गावात मतदान जनजागृती , थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन , लहान विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा , वृक्षारोपण, तंबाखू व्यसन मुक्तीसासाठी जनजागृती वर कार्यक्रम स्वच्छता अभियान , तसेच लॉक डाऊन च्या काळात, कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अनेक प्रयत्न केले , गावामध्ये फवारणी व गरजूंना मास्क वितरण , सोशल मीडिया वर जनजागृती , विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण , इत्यादी कार्य केले याबद्दल विशाल ला ग्रामपंचायत कार्यालय वरुर रोड यांच्या कडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच लॉक डाऊन काळात विशाल ने मुखमंत्री सहायता निधी साठी स्वतःच्या मजुरीतुन एक हजार रुपये व मित्राकडून मिळालेले 800 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले.तथा मित्रांना निधी जमा करण्यास आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान केअर फंड मध्ये निधी गोळा केली… तसेच विशाल शेंडे याने अनेक स्पर्धा जिंकल्या आहे तदवतचं गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन, पंधरा राज्यातील विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक घेऊन महाविद्यालये नाव उच्च पातळीवर नेण्याचे कार्य केले सदैव धडपडणा-या.विशालच्या या कार्याचे सर्व स्तरांवरुन काैतुक करण्यांत येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here