आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा शेतकऱ्यास आधार.

0
502

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा शेतकऱ्यास आधार.

तळोधी नाईक येथील विद्युत शॉर्ट सर्किट 2 बैल जखमी

ऐन हंगामात ठाकले होते संकट

तालुका प्रतिनिधी

चिमूर

 

तळोधी नाईक येथील शेतकरी रामू मेश्राम यांच्या गोठ्याला विद्युत शॉर्ट सर्किट ने आग लागली असता 2 बैल व रामू मेश्राम स्वतः जखमी झाले होते.

ऐन हंगामाच्या काळात या शेतकऱ्यांवर मोठे संकट ठाकले होते. या बाबत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कलिम शेख यांना माहिती दिली.

लगेचच कलिम शेख यांनी सदर शेतकऱ्यावर ठाकलेल्या संकटाची माहीती आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना कळवली या प्रतिसाद देत आमदार भांगडीया यांनी पीडित शेतकऱ्यास आर्थिक मदत जाहीर केली.

 

आर्थिक मदत रामू मेश्राम यांना त्यांचा निवासस्थानी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक,माजी सरपंच कलिम शेख यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी जेष्ठ भाजप नेते रमेश कंचर्लावार,तळोधी नाईक ग्राम पंचायत चे सरपंच मदनपाल येसांबरे,भाजपा नेते नामदेव ननावरे, सलीम शेख तमुस अध्यक्ष शकील शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here