दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 559 कोरोनामुक्त

0
460

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 559 कोरोनामुक्त

11 मृत्यूसह 239 नवीन कोरोना बाधित

दि.03 : आज जिल्हयात 239 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 11 नवीन मृत्यूमध्ये 48 वर्षीय महिला मोहरली ता.मुलचेरा, 52 वर्षीय पुरुष मोहली ता.धानोरा , 65 वर्षीय महिला कनेरी गडचिरोली , 69 वर्षीय पुरुष नान्ही ता.कुरखेडा, 46 वर्षीय पुरुष वासाडा ता.आरमोरी , 70 वर्षीय महिला धानोरा, 65 वर्षीय महिला गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष विसोरा ता.वडसा , 26 वर्षीय महिला आरमोरी, 48 वर्षीय पुरुष वडसा, 65 वर्षीय महिला कोरची यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 239 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 127, अहेरी तालुक्यातील 13, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 2, चामोर्शी तालुक्यातील 14, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 4, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 4, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 37 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 12 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 559 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 175, अहेरी 51, आरमोरी 24, भामरागड 29, चामोर्शी 40, धानोरा 25, एटापल्ली 31, मुलचेरा 12, सिरोंचा 14, कोरची 29, कुरखेडा 48, तसेच वडसा येथील 81 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here