प्रमुख राज्य मार्ग २६४ ए वरील कढोली येथे होत असलेल्या बंदिस्त गटाराचे व पाईप पुलाचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे

0
592

प्रमुख राज्य मार्ग २६४ ए वरील कढोली येथे होत असलेल्या बंदिस्त गटाराचे व पाईप पुलाचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे

राजुरा/कढोली बूज, विर पुणेकर (१२ एप्रिल) : प्रमुख राज्य मार्ग 264 A दाताळा हडस्ती कढोली पौनी मार्गाचे काम चालू आहे. तरी कढोली येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट बंदिस्त गटारी चे काम व छोट्या पाईप पुलाचे काम निव्वळ काळ्या माती वरती काँक्रेट पसरुन कामाला गतीने समोर नेण्यात येत आहे.
काँक्रिट मध्ये रेती ऐवजी घिसा मिसळन त्या काँक्रिट ची गुणवत्ता पूर्णपणे नित्कृष्ट करण्यात आलेली आहे. सदरचे काम मजबुती योग्य उरलेले दिसून येत नाही.
आजपावेतो झालेल्या बांधकामास पाहता त्या बांधकामास हाताने धक्का दिल्यास ते काँक्रिट ढासळून खाली पडून मातीस मिळत आहे. याबद्दल गावकर्यांनी विचारणा केली असता संबधित कंत्राटदार उडवा उडवी चे उत्तर देत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा चे अभियंता बाझारे यांना मागील दोन महिन्यापासून राकेश हिंगाने सरपंच कढोली बु यांनी कामाची पाहणी करण्यास निवेदन दिले असता त्या निवेदनास दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी आजपर्यंत ही कामा ची पाहणी करण्यास ते व कुठलेही संबंधित अधिकारी आलेले नाही. यावरून असा संशय येतो की बांधकाम विभागाच्या संमतीने कंत्राटदार असे काम करत असेल अशी शंका सरपंच राकेश हिंगाने यांनी व्यक्त केली.
कंत्राटदाराला पूर्ण सूट दिली आहे का? अधिकारी स्वतःच्या घराचे बांधकाम याप्रकारे करणार का? शासनाच्या पैशाचा अपव्यय करत स्वखिसे भरत तर नाही ना? यांना जाब विचारणारा कोणी नाही का? मागील दोन महिन्यापासून कोणताही अधिकारी कामाची पाहणी करण्यास आलेले का नाही, शासनदरबारी समस्या मांडून निपटारा होत नसेल तर सामान्य जनतेने व्यथा मांडायची कोणाकडे? तरी या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. ती लवकरात लवकर व्हावी अशी गावकर्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here