लाँकडाऊन शिथिल करून व्यवसाय सुरू करू द्या! वंचित बहुजन आघाड़ीची तहसीलदार नागभीड यांच्याकडे निवेदनातून मागणी

0
506

लाँकडाऊन शिथिल करून व्यवसाय सुरू करू द्या!

वंचित बहुजन आघाड़ीची तहसीलदार नागभीड यांच्याकडे निवेदनातून मागणी

नागभीड : लाँकडाउन शिथिल करुन लहान मोठे व्यवसाय सुरु करण्याकरीता नागभिडचे तहसीलदार यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाड़ी तर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना जिल्हा कार्यकारणी सदस्य अश्विन मेश्राम यांच्या नेतृत्वात सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.
रोजगार नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्याला तरूणयुवक, सर्वसामान्य लोक तोंड देत असतांना मागील एक वर्षापासुन कोरोणामुळे लागलेल्या लाँकडाऊनमुळे सरकारी कर्मचारी वगळता लोकांची आर्थिक स्थिती हलाकीची झाली आहे. हातावर काम करून सकाळ संध्याकाळचे पोट भरणाऱ्या श्रमिक कामगारांना उपासमारीमुळे आत्महत्या करण्यास परावृत्त केले जात आहे.
टपरीवाल्या पासुन ते अगदी लहान व्यवसाय लाँकडाऊनमुळे बंद पडलेले आहे. तर विजवितरण विभागाकडुन पाचशे रुपयाच्यावर विजबिल असले की मार्च एंडीग च्या नावाखाली विज खंडीत केली जात आहे. यामुळे लोकांनी पोट भराव की विज बिल भराव, हा कळीचा प्रश्न पुढे आला आहे. काम बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीना सामोरे जातांना त्यावर सरकार काही उपाय योजना न करता एक शब्द ही बोलत नाही आणि सरकार म्हणताय सर्वसामान्य लोंकांना जगवायच आहे.
सरकारी कर्मचारींना घरबसल्या पगार देने म्हणजे सर्वसामान्य लोकांना जगवने होय का ? याचा सरकार ने विचार केला पाहीजे. सामान्य जनता पगार मागत नाही पण आधिच बेरोजगारी ने त्रस्त असलेल्या परंतु मिळेल त्या कामावर पोट भरणा-या लोकांची लाँकडाऊनमुळे कामे बंद सरकार नी केली आहे. तर एकीकडे महागाईने कंबरडे मोडले असतांना महीलांना गँस इंधन ते खाण्याच्या तेलाचा तर पुरूष पेट्रोल भाववाढीचा सामना करीत असतांना केंद्र व राज्य सरकार ऐकमेकांकडे बोट दाखवित असुन सर्व सामान्य जनता होरपळली जात आहे. अशा उपासमारीच्या परीस्थितीत जगाव की मराव सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न असुन सरकार उपाय योजना न करता लाँकडाऊनच्या नावाखाली आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे.
आज करोना निगेटिव्ह आलेला व्यक्ति सामोर पाँझिटीव्ह येऊ शकतो आणि कोरोना न संपणारी प्रक्रिया असुन डब्ल्यू एचओ नुसार आयुष्यभर कोरोना सोबत घेऊन जगाव लागणार आहे. तर मग आयुष्यभर सरकार लाँकडाऊन करणार काय ? सरकारने नियम कठोर करावे पंरतु लाँकडाऊन कोरोनावर उपाय नाही लोकांना स्वतःच्या जिवाची काळजी असल्याने त्यावर दवाखाण्यात उपचार ही केले जातील. परंतु सरकार ने लाँकडाऊनच्या परीस्थितीत उपासमारीमुळे आत्महत्यास लोकांना प्रवृत्त करू नये.
लाँकडाऊन हटवून लहान मोठ्या व्यवसायींकाना संपुर्ण नियमावली अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. जेनेकरून रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे लाँकडाऊन शिथिल करावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाड़ी तर्फे देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य अश्विन मेश्राम, तालुकाध्यक्ष खेमदेव गेडाम, महीला अध्यक्षा सौ कल्पना खरात, महासचिव शैलेंद्र बारसागडे, सचिव संतोष जिवतोडे, मानिकजी दोहीतरे, केशव माटे, धर्मविर गराडकार इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here