*प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे*
अमरावती :- जागतिक चहा दिवस निमित्त येथील खापर्डे बगीचा स्थित माऊली चहा प्रतिष्ठान दिशा बहुउदेशीय संस्था , गायत्री नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हौशी चित्रकारांनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला.

शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील चित्रकारांनी सुद्धा या स्पर्धेला प्रतिसाद दिला. या स्पर्धेची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली प्रतिष्ठानचे संचालक मनीष जगताप यांनी सांगितले की, छोटेखाणी उपक्रम म्हणून या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्साही चित्रकारांचा याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.ज्यामुळे सुरुवातीला 25 सप्टेंबर पर्यंत मुदत असलेली ही स्पर्धा वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली. या स्पर्धेत बाहेर जिल्ह्यातील हौशी चित्रकार यांनी सुद्धा सहभाग घेण्यासाठी फोन केले. मात्र त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था होऊ शकली नाही. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादासाठी त्यांनी कला प्रेमींचे व कलाकारांची आभार मानले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निलेश चौधरी ,प्रशांत टाके ,गायत्री नर्सरी चे संचालक क्रांती चौधरी ,चेतन चौधरी यांचे योगदान लाभले..