महावितरणच्या लाईनमन कडुन ग्राहकाची आर्थिक लुट

0
479

महावितरणच्या लाईनमन कडुन ग्राहकाची आर्थिक लुट

● मिटर लावला नाही बिल मात्र घरपोच

 

राजुरा : राजुरा वीज वितरण उपविभागीय कार्यालय अंतर्गत लाईनमन कडून वीज ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या ग्राहकांना वीज मिटर वितरण कार्यालयाकडून देण्यात आले नाही. त्या ग्राहकांना मात्र महिण्याअखेरीस वीज बिल घरपोच मिळाले. असा वीज वितरण कार्यालयाचा ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.

 

 

राजुरा अंतर्गत येणाऱ्या कापनगाव येथील श्रीकृष्ण नामदेव निवलकर या ग्राहकाला मागील चार पाच महिन्यापासून मिटर निघूनही लाईनमन राकेश येमुलवार यांनी सदर ग्राहकांनी पैसे न दिल्यामुळे मिटर लावलेच नाही. पण महावितरण कंपनीने विज बिल मात्र घरपोच वेळेत पाठविले. असा वीज वितरणचा बोगस कारभार उजेडात आला आहे. तसेच आर्वी येथील संजय चिलमुले यांच्याकडे १३ हजार रुपये थकित होते म्हणून त्यांचा मिटर काढून कार्यालयात जमा करण्यात आला. यानंतर संजय चिलमुले यांनी १३ हजार रुपये, त्यावरील व्याज व पिडि चार्ज भरला. यानंतर मीटर लावून द्या म्हणाले, परंतु सबंधित अधिकारी त्यांना नविन कागदपत्र तयार करून कार्यालयास सादर करण्यास सांगितले. तसा अर्ज संजय चिलमुले यानी कार्यालयास सादर केला परंतु ६-७ महिने लोटूनही राकेश येमुलवार यांनी सर्वे दिला नाही म्हणुन त्यांचे डिमांड मिळालेच नाही. याबाबत लाईनमन यांना विचारले असता, त्यानी किती पैसे देता असे स्पष्ट ग्राहकास म्हटले आहे. त्यामुळे लाईनमन राकेश येमुलवार हे आपल्या कामात कसूरवार दिसत असून ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास देणे, आपल्या कामात दिरगांई करणे असे अनेक प्रकार त्यांच्या बाबतीत उघडकीस आले आहे.

 

 

काल २२ सप्टेंबरला अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करून लाईनमन द्वारे पैशाची मागणी करणे, पैसे न मिळाल्याने वीज मिटर दडवून ठेवणे, ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास देणे, विद्युत विभागाची दिशाभूल करणे या सर्व बाबींचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच संबधित कर्मचारी राकेश येमुलवार यांना तात्काळ निलंबित करून कंपनीच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. दोन ते तीन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here