आमदार डॉ देवराव होळी यांनी थेट जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड केअर सेंटरला दिली भेट 

0
559

आमदार डॉ देवराव होळी यांनी थेट जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड केअर सेंटरला दिली भेट 

येथील नवनिर्मित अॉक्सिजन प्लांट व्यवस्थेचा घेतला आढावा

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी थेट कोरोणा वार्ड येथील भरती रुग्णांची भेट घेतली व समस्या जाणून घेतल्या व येथे होत असलेल्या उपचारा बाबत सविस्तर माहिती घेतली यावेळी बोलतांना आमदार डॉ होळी यांनी सांगितले.

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोणत्याही उपचाराची कमी पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्त डॉक्टरांनी कार्य करताना रुग्ण सेवा हीच*ईश्वर* सेवा आहे या भावनेने काम करावे असे जाहीर आव्हान केले व जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तयार होत असलेल्या आक्सिजन प्लांट व्यवस्था बद्दल सविस्तर माहिती घेतली व सदर अाक्सिजन प्लांट व्यवस्था तत्काळ सुरू करण्यात यावे असे निर्देश दिले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे ,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रूढे ,डॉ बागराज धूर्वे ,डॉ माधुरी कीलनाके , स्नेहल संतोषवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here