भेंडाळा हद्दीच्या शेत शिवारातील विहीरीत उडी घेऊन मायलेकीने संपवली जीवनयात्रा

0
1472

मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात

 

 

✍️ चामोर्शी:- सुखसागर झाडे गडचिरोली.

चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथील रहिवासी मयत महिला नामे सुरभी प्रणीत बारसागडे वय २५ वर्षे. व त्रिशा प्रणीत बारसागडे वय २वर्षे या दिनांक ५ जुलै सोमवार ला आपल्या राहते घरुन मुलीचे आधारकार्ड काढण्याकरिता भेंडाळा येथे जात आहे, असे पतीला व घरच्या मंडळींना सांगून भेंडाळा येथील शेतशिवारात असलेल्या विहीरीत मयत सुरभीने आपल्या चिमुकली सह उडी घेत जीवनयात्रा संपवली. सकाळची सांयकाळ झाली परंतु पत्नी व मुलगी घरी परत आल्याच नाही, म्हणून या चिंतेत असलेले मयत व्यक्तीचे पती नामे प्रणीत बारसागडे व घरच्या मंडळींने भेंडाळाला जावुन तिथे इतरत्र शोध घेतला व आप्त नातेवाईकांना फोन करून विचारपुस केले असता पत्नी चा व मुलीचा कुठेच शोध लागला नाही. दुसऱ्याच दिवशी ६ जुलै रोज मंगळवार ला थेट चामोर्शी पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या घटनेची माहिती देत पोलीस ठाण्यात पत्नी व मुलगी लापता असल्याची रितसर तक्रार दिली. पोलीस निरिक्षक शेवाळे पो. स्टे.चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चमुने शोध मोहीम राबवली. आज दिनांक जुलै रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात दोन मृतदेह भेंडाळा हद्दीच्या शेतातील विहीरीत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेवाळे, स.पो.नी नागनाथ पाटील, पो. उप. नि. निशा खोब्रागडे, पो.ह.चंद्रशेखर गंमपलवार,पो.ह.लाकडे,पो.शि.ऊईकेव इतर कर्मचारी वर्गाने घटना स्थळ गाठले. व विहीरीत सडक्या अवस्थेत असलेल्या मृत्यदेह ताब्यात घेत शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठवले.भांदवी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करीत पुढील तपास पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, पो.ह. गंम्पलवार व इतर पो. कर्मचारी करीत आहेत. सदर घटनेमुळे कान्होली गावात, परिसरात शोककळा व हळ-हळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here