भिम आर्मी ची ऊर्जानगर (कोंडी) येथे शाखा गठीत

0
314

भिम आर्मी ची ऊर्जानगर (कोंडी) येथे शाखा गठीत

आज दिनांक 26 मार्च रोजी भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष ऍड. चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई सीताराम गंगावणे यांच्या कार्यास प्रेरित होऊन जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या नेतृत्वात ऊर्जानगर (कोंडी) येथील शाखा गठीत करण्यात आली.

जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपूरे यांनी संघटनेचे उद्देश, महत्व आणि कार्य याबद्दल सांगत असताना म्हटले कि देशातील प्रत्येक नागरिक स्वतःस सुखरूप समजतो कारण सिमा रेषेवर देशातील सैनिक पहारा देतोय, शहरातील, गावातील लोक आज सुखाने झोपी जातात कारण इथली पोलीस यंत्रणा सौरक्षण देते, गस्त घालते पण इथल्या मूलनिवासी बहुजन समाजच काय त्यांना सौरक्षण कोण देणार, आणि चिंतेतून एक नाव समोर आले आणि ते नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद यांचे होते. त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि कार्यप्रणाली सर्व युवकांच्या मनात घर करीत आहे त्यांचा कल स्वतःकडे करीत आहे.

असेच चंद्रशेखर आझाद आपल्यास वार्डा -वार्डात तयार करायचे आहेत. आणि समाज रक्षणाच्या, संविधानाच्या रक्षणार्थ कार्य कसे करायचे आहे या बद्दल माहिती दिली.

शाखा प्रमुख पदी रवींद्र तितरे उर्फ छोटू भाऊ यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. शाखा उपाध्यक्ष पदी मनीष रामटेके, कोषाध्यक्ष पदी चित्रसेन उर्फ बाळू रायपुरे, सचिव पदी आशिष रामटेके, सहसचिव पदी छत्रपाल वाकडे, सल्लागार पदी संतोष खांडेकर, मीडिया प्रमुख पदी मनोज रायपुरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सुरज कासवटकर, अनिल कटरे, विश्व्जीत ढाकणे, संदीप ग्रामीत, अनिकेत शेंडे, भिमा गेडाम, प्रणय शामकुरे, खुशाल दुधे, सुजित ढाकणे, अभिजित दुर्योधन यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here