गोविंद वाघमारे
प्रतिनिधी जिवती- mo.n.8806532090

जिवती- तालुक्यातील कुंभेझरी येथे पावसाळा लागूनही नाल्याच्या उपसा झालेला नाही. नाल्याचा उपसा न झाल्यामुळे, नालीतुन वाहनारे पाणी जागीच थांबत असल्यामुळे गटार होऊन डासाची उत्पत्ती होऊन गावातील लोकांना डेंगो ,टायफाईड सारख्या आजारस आमंत्रण दिल्या सारखं होत आहे . तसेच सांडपाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. तर काही लोकांच्या दारात पाणी साचून गटार झाल्या सारखी अवस्था झाली आहे. म्हणूनच गावातील लोकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याच प्रमाणे काही वॉर्ड मध्ये नाल्या सांडपाण्याने गच्च भरल्या असल्याने डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावात साथीचे आजार पसरन्याची भीती निर्माण होत आहे . ग्रामपंचायत प्रशासनाणे नेहमीच गावाच्या विकासाच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे विजेची समस्या तर या गावात नेहमी असतेच ,ग्रामपंचायत प्रशासनाणे लक्ष देऊन नाली उपसा लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे .
Impact24news