चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 396. पोंभुर्णा तालुक्यात एका कोरोना बाधिताची नोंद.

0
1360

 

220 कोरोनातून बरे ; 176 वर उपचार सुरु

चंद्रपूर, दि. 25 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 396 वर पोहोचली आहे. आज सायंकाळपर्यंत आणखी 15 रुग्ण पुढे आले आहेत. 24 तासात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 37 आहे. कालपर्यंत 359 असणारी ही संख्या आज वाढवून 396 झाली आहे. आत्तापर्यंत 220 बाधित कोरोना आजारातून बरे झाले असून 176 बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

आज पुढे आलेल्या 15 बाधितांमध्ये गोंडपिपरी जवळील चींतल धाबा येथील एका बाधिताचा समावेश आहे. तर गडचांदूर येथील एक व पालगाव येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

नागभीड तालुक्यातील वळणी राईस मिल येथील एक व कोरधा येथील एका 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.कर्नाटकमधून प्रवासाची नोंद आहे.

ब्रह्मपुरी शहरातील हनुमान नगर येथील आणखी एका 34 वर्षीय महिला बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपूर महानगर क्षेत्रातून देखील चार नागरिक आणखी पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये स्थानिक बालाजी वार्ड परिसरातून एक व्यक्ती, रामनगर दाताळा रोड या परिसरातून एक व्यक्ती, तसेच एका खाजगी रुग्णालयात दाखल असणारा एक रुग्ण पॉझिटिव्ह पुढे आला आहे. बल्लारपूर शहरातून एक नागरिक पॉझिटीव्ह झाला आहे.

याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अँटीजेन चाचणीमध्ये कोरपना येथील 37 वर्षीय पुरुष, घुग्घुस रामनगरमध्ये श्वसनाच्या आजाराने त्रस्त असणारे 60 वर्षाचे गृहस्थ, राजुरा जवळील चुनाळा येथील 26 वर्षीय अन्य भागातून प्रवास केलेल्या युवकाचा समावेश आहे. तीन जण पॉझिटिव्ह आले आहे. असे एकूण 15 जण आज दिवसभरात पॉझिटीव्ह ठरले आहे.

तर 25 जुलैला दुपारपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये गडचांदूर 7, भद्रावती 2, ब्रह्मपुरी 10, चंद्रपूर महानगरपालिका 3 अशा एकूण बाधिताचा समावेश आहे.

यामध्ये गोपाल पुरी बालाजी वार्ड चंद्रपूर येथील 39 वर्षीय महिला 14 वर्षीय मुलगा हे संपर्कातून पॉझिटिव्ह झाल्याचे पुढे आले आहे. यवतमाळ वरून प्रवास केलेल्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील हे बाधित आहेत.

राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीतील चंद्रपूर वरून भद्रावती येथे जैन मंदिर अलगीकरण कक्षात हलविण्यात आलेले 26 वर्षीय दोन जवान पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत 30 राज्य राखीव दलाचे पोलिस जवान पॉझिटिव्ह ठरले आहे.

गडचांदूर येथील लक्ष्मी थेटर वार्ड नंबर चार या भागात एका पॉझिटिव्ह मुळे शेजारील 5 जण पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये एका महिलेसह 4 पुरुषांचा समावेश आहे.

याशिवाय कोरपना नांदा फाटा परिसरातील 29 वर्षीय युवक वाराणसी येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. या युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.

कोरपना तालुक्यातील पालगाव येथील चेन्नई येथून आलेल्या नागरिकाच्या संपर्कातील 53 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे.

चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्ड येथील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर 24 जुलैला जिल्हा सामान्य रुग्णालयात या कर्मचाऱ्यांना भरती करण्यात आले होते.

याशिवाय आज पुढे आलेल्या अहवालामध्ये 10 रुग्ण ब्रह्मपुरी तालुक्यातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसाघली पो.हालदा येथील चेन्नईवरून परत आलेल्या 10 बाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. हे 10 कामगार कुडेसाघली येथील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here