आष्टीत संविधान दिन झाला साजरा ! अनेकांची उपस्थिती !
चंद्रपूर 🛑🟢🟣किरण घाटे🟡🟣🛑
37 व्या बामसेफ तथा 10 व्या भारत मुक्ती मोर्चा संयुक्त राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारी अंतर्गत भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि धम्मदीप बौद्ध समाज मंडळ, आष्टी यांच्याद्वारे संविधान दिन व राष्ट्रपिता ज्याेतीराव फुले यांचे स्मृतिदिन (शिक्षक दिन) निमित्त प्रबोधन समारोह दि.29 नोव्हेंम्बर 2020 ला बुद्ध विहार आष्टी येथे सम्पन्न झाला.

🟢🛑या वेळी दाेन ज्वलंत विषयावर प्रफुल पाटील (पूर्व विदर्भ प्रभारी, बामसेफ नागपूर) यांनी प्रबोधन केले.तर प्रा. सुबोध साखरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.तसेच प्रा. दिनकर हिरादेवे, संध्या मोंढे, अर्चना केळझरकर, दौलत आत्राम, आणि प्रकाश डहाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
🟢🟣🟡बापसा संस्था आष्टी यांच्या तर्फे राष्ट्रपिता ज्याेतीराव फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध व प्रश्नावली स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
उपराेक्त कार्यक्रमाचे संचालन स्वप्निल धुरके व सुजाता बावणे, संविधान प्रास्ताविकेचे वाचन फरहत मोहमद तर प्रस्ताविक संघशिल बावणे यांनी केले उपस्थितीतांचे आभार साहिल साखरकर यांनी मानले .कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली हाेती .