विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे संगमनेरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

0
927

विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे संगमनेरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

 

 

अहमदनगर/प्रतिनिधी – ज्ञानेश्वर गायकर पाटील (संगमनेर) रविवार दि. १२ जून रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराज यांचे मेव्हणे सरदार कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज श्री संग्रामसिंग जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील महाराज यांच्या मूर्तीचे ११ ब्राह्मणांच्या मंत्र उच्चाराने राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

 

सकाळी ७:३० ते ८:३० वाजेपर्यंत भारतातील पवित्र ११ नद्यांचे जलपूजन करून सकाळी ८:३० ते १० वाजेदरम्यान ११ ब्राह्मणांच्या मंत्र उच्चाराने शिवराज्याभिषेक झाला. १० वा. शिववंदना व आरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, त्यानंतर प्रसाद वाटप झाले. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक अशोकराव सराफ, पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख सर, विश्व हिंदू परिषदेचे गोपाळ राठी, प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, संदीप वारे, विशाल वाकचौरे, कुलदिप ठाकूर, शुभम कपिले, आशिष ओझा, गणेश भोईर, आकाश राठी, राजेंद्र महाजन, वाल्मिक धात्रक, रमेश शहरकर, आशुतोष भुजबळ, श्याम नाईकवाडी, जितू तिवारी, गणेश भोईर, अजिंक्य डोंगरे, रवी मंडलिक, दुर्गावाहिनीच्या गुंजन कर्पे व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी व शिवभक्तांची मोठी गर्दी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here