मान्सुनपुर्व शहरातील नाले सफाई करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

0
330

मान्सुनपुर्व शहरातील नाले सफाई करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

मनपा आयुक्तांना निवेदन

 

 

दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचते याचा मोठा त्रास रहदारीवर दिसुन येतो. तसेच नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याच्या घटनाही दरवर्षी घडतात त्यामुळे यंदाच्या पासवळ्यात तरी हि परिस्थीती उद्भवणार नाही या करिता मान्सुनपुर्व शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, बबलु मेश्राम, संतोष सोनकर यांच्यासह ईतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

मान्सुनपुर्व शहरातील प्रमुख नाल्यांची योग्य सफाई होत नसल्याने याचा परिणाम पावसाळ्यात जाणवतो नाल्यांमधील साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात नाले तुंबतात त्यामुळे नाल्याचे पाणी शहरातील प्रमुख मार्गावर साचत. याचा परिणाम वाहतुकीवर होतो. तसेच नाल्याचे पाणी साचल्याने रस्त्यांवर सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरत असते. तसेच नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे घटनाही दरवर्षी समोर येत असतात त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सदर परिस्थिती न उद्भवावी यासाठी आता पासुन मनपा प्रशासनाने नियोजीत नियोजन करणे गरजेचे आहे. रस्त्यावर पाणी साचत असलेल्या भांगाची यादी तयार करुन या भागात विशेष उपाययोजना करण्यात यावात, सदर रत्याकडेला असलेल्या नाल्यांची गाळ काढून नाले स्वच्छ करण्यात यावे, पाणी साचलेच तर पाण्याचा इतरत्र विसरा करण्यासाठी मोटर लावण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणीचे निवेदन महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here