दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, जिवती तालुक्यातील प्रकार “शाळा बंद पगार चालु”

0
103

दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, जिवती तालुक्यातील प्रकारशाळा बंद पगार चालु

गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष, शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान

 

जिवती – प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य मुले वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांच्या बेशिस्तपणा मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र सध्या जिवती तालुक्‍यात दिसून येत असल्याने “शिक्षकांना कर्तव्याचा विसर पडला’ अशी म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे. तालुक्‍यातील कित्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात आले आहे.
कित्येक शाळेमधील शिक्षक हे घरूनच शाळेला राम राम करताना दिसुन येत आहेत.

जिवती तालुक्यातील कामतगुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागील अनेक दिवसापासून बंद स्थितीत आहे. या शाळेत रुजू असलेले शिक्षक फक्त 26 जानेवारी आणि जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त शाळेला दर्शन देतात. याबाबत स्थानिक गावकऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी गावकऱ्यांसोबत अरेरावी करत तुम्हाला माझी तक्रार कुणाला करायची आहे ते करा “कोणाच्या बापाचे हिंमत नाही माझे काही बिघडवायची” अशा शब्दात दमदाटी केली. तसेच या शिक्षकांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या जाग्यावर गावातीलच एका शिक्षित तरुणाला दहा हजार रुपये महिना ने आपल्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ठेवले होते परंतु त्यांच्या देवाण-घेवांनी मध्ये झालेल्या वादामुळे त्या तरुणाने सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवणे सोडून दिले. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून अंदाजे 30-35 विद्यार्थी संख्या असलेल्या त्या शाळेला कुलूपच आहे. अशीच थोडीफार परिस्थिती असलेल्या जिवती तालुक्यात अनेक शाळा आहेत, त्यात प्रामुख्याने अंतापुर जिल्हा परिषद शाळा, पद्मावती, इसापूर नारायण गुडा, इंदिरानगर या शाळा आहेत. हे गावे तेलंगणा व महाराष्ट्र च्या सीमेवर असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या शाळेंकडे दुर्लक्ष झालेले आहे,त्यामुळे या शाळेवर रुजू असलेले शिक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणाचा फायदा घेतात. शिक्षण अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,व संबंधित शिक्षकांवर बेशिष्टपनाची कारवाई करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here