आदर्श शाळेत श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम संपन्न

0
226

आदर्श शाळेत श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम संपन्न

गरजू विद्यार्थ्यांना “एक बुक एक पेन वाटप”

संतांच्या विचारांचा प्रभाव मानवी प्रगती करिता – सतीश धोटे

 

राजुरा 8 डिसें. : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ” एक बुक , एक पेन” वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश धोटे, अध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संत जगनाडे महाराजांच्या जीवनचरित्रविषयी माहिती दिली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, जयश्री धोटे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, नवनाथ बुटले, मेघा वाढई,आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते, माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट मास्तर बादल बेले यांनी केले. तर आभार प्रशांत रागीट यांनी मानले. महाराष्ट्राची पावन भूमी ही संतांची भूमी असून त्यांचे विचार आपण अवगत केले पाहिजे. संतांच्या विचारांचा प्रभाव मानवी कल्याण व प्रगतिकरिता झाला पाहिजेत असे प्रतिपादन सतीश धोटे यांनी केले.

संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकारामाचे अभंग गाथा लिहून काढली. त्यांची स्मरण शक्ती फार अलौकिक होती. त्यामुळे अश्या महान संतांच्या जयंती निमित्य एक बुक एक पेन हा उपक्रम घेऊन संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले असे बादल बेले यांनी सांगितले. सरिता लोहबळे व संजना कवलकर यांना नैसर्गिक पर्यवारण संवर्धन व मानवता विकास संस्थे कडून बादल बेले यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here