वंचित बहुजन आघाडी चे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

0
619

वंचित बहुजन आघाडी चे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन!

 

गोंडपिपरी : पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणां विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते. तसेच धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याच्या विरोधात बंधुतेच्या मूल्यांचे हनन होवू नये म्हणून “पैंगंबर मोहम्मद बिल” गेल्या अधिवेशनात वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानपरिषद सदस्य आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आले. मात्र शासनाने अजून या संबंधी काहीच कृती केली नाहीय. शासनाच्या याच वृत्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 जुलै 2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन उपरोक्त मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पहोचवण्यात आले होते तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून जनजागृती अभियान चालवण्यात आले तरी ही शासनातील तिन्ही पक्ष या मागणीकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर असुन सोमवार 22 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणां विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
1. धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘पैगंबर मोहम्मद बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
2. न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
3. महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
4. संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
5. वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
6. सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा महासचिव धिराज बांबोडे, जिल्हा सल्लागार सुरेश दुर्गे, जिल्हा सदस्य सुरेंद्र मांदाडे, जिल्हा नेते तेजराज डोंगरे, तालुका अध्यक्ष डॉ . प्रकाश तोहोगावकर, तालुका महासचिव संदेश निमगडे, सुरेंद्र रायपूरे, राजेश डोडीवार, तालुका उपाध्यक्ष भारत चंद्रागडे, चक्रपाणी दुर्गे, डाँ. पूनेश्वर रामटेके, लक्ष्मण रामटेके, हनमतु कनाके, विजय दुर्गे, अविनाश राऊत, गुरुदास झाडे व अनेक कार्यकर्ते यांची उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here