कोविड रुग्णांना फळ आणि बिस्कीटचे वितरण

0
607

कोविड रुग्णांना फळ आणि बिस्कीटचे वितरण

राजुरा, अमोल राऊत (२० मे) : “मन मे है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन….” या गीतामधून जशी काही तरी करण्याची जिद्द निर्माण होते. त्या परीने यिन सकाळ माध्यम आणि युथ फाउंडेशन चंद्रपुर यांच्या तर्फे ‘एक हात मदतीचा – जगुया थोड़ माणुसकीसाठी’ विचारातुन जागर होवून या आपल्या समाजासाठी आपली कर्तव्यदक्ष जबाबदारी समजून मदती साठी युवा पीढ़ी समोर आली. कोविड केअर सेंटर, समाज कल्याण भवन राजुरा, येथिल कोविड रुग्णांना फळ आणि बिस्कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. सोनाली करमनकर, परिचारिका बी. लिहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. या समाज कार्यासाठी विशेष सहकार्य लाभले यिन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा यिन पालकमंत्री चंद्रपूर अंकिता अविनाश देशट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा. धनराज उमरे याच्या उपस्थितीत व सहकारी पूजा ताजने, प्राची नांदलवार, वेदांत देशट्टीवार, उत्पल गोरे, सूरज गव्हाने, कार्तिक बल्लावार, पराग दिंडेवार, वैष्णवी लिमजे, शुभम मोटमावर, जय निखारे, रवी झाडे आदिनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here