मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा…

0
434

मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा…

जनतेच्या ऐक्य व विश्वासामुळेच भारतीय लोकशाही अबाधित! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

घुग्घुस येथील मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गुरुवारी (दि. २६) रोजी सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रसंगीच बोलतांना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचे जतन करणे, त्यांना बळकट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत, सुधारणावादी विचारधारा पुढे नेण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण केला पाहिजे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात शहीद वीरांना ही आजच्या या शुभप्रसंगी मी अभिवादन करतो. जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांताच्या भिंती ओलांडून समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येत, एकजूट कायम ठेवण्याची आवश्यकता आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळालं, देश प्रजासत्ताक झाला, त्यावेळी देशासमोर अनेक आव्हानं होती, काळ मोठा कठीण होता. परंतु भारतीय जनतेने वेळोवेळी दाखवलेल्या ऐक्य व विश्वासामुळे ही संकटं दूर झाली. जगातल्या इतर देशांत लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचं श्रेय देशातील जनतेला, जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. लोकशाही व्यवस्थेवर, राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांमुळे हे शक्य झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या,त्यांच्या कुटुंबियांच्या,देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान,त्यागाबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा घुग्घूसचे अध्यक्ष सुरेश पी. खडसे, माजी जि. प. सभापती नितू चौधरी, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, साजन गोहने, सिनु इसारप, अमोल थेरे,  विनोद चौधरी, चिन्नाजी नलभोगा, मल्लेश बल्ला, शेखर तंगलापेल्ली,  प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, अमीना बेगम, नाझिमा कुरेशी, निशा उरकुडे, सुनीता पाटील, चंद्रकला मन्ने, किरण जुनघरे, हेमराज बोमले, स्वामी जनगम, गणेश खुटेमाटे, प्रेमलाल पारधी, कार्तिक तिवारी, जयराज घोरपडे, मंदेश्वर पेंदोर, सुरेंद्र भोंगळे,  सांभशिव खारकर, अनिल नित, रवी चुने, वमशी महाकाली, श्रीकांत बहादूर, सुशील डांगे आदिंसह मोठ्या संख्येत घुग्घुस वासीय बंधूभगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here