राज्यात किसान बाग आंदोलनासाठी वंचितची तयारी

0
529

राज्यात किसान बाग आंदोलनासाठी वंचितची तयारी

जालना,दि.२४ – वंचित बहुजन आघाडीकडून जालन्यात २७ जानेवारी रोजी किसन बाग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्र सरकारने कृषी विधेयक बिल पास केले असून हे बिल रद्द करावे, यासाठी गेले दोन महिने दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या धर्तीवर राज्यात येत्या २७ जानेवारी रोजी किसान बाग आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केल्याचे वंचित बहुजन आघाडीने या अगोदरच जाहीर केले आहे. सीएए या कायद्याविरोधात राज्यात वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम आंदोलन केले होते. आताही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम आंदोलनाला सुरुवात केली आहे. येत्या २७ जानेवारीला ही अशाच प्रकारचे मोठे आंदोलन राज्यभर केले जाणार आहे. त्यानिमित्त जालन्यात किसान बाग आंदोलन कशा स्वरूपाचे केले जाईल, याची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, पश्चिम जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, पुर्व जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, अकबर इनामदार, खालेद चाऊस, अँड. कैलास रत्नपारखे, सतीश खरात, डॉ किशोर त्रिभुवन, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे, किशोर जाधव, अर्जुन जाधव यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here