याेग प्राणायामाच्या माध्यमांतुन शरीर निराेगी राहु शकते -आमदार किशाेर जाेरगेवार
🟡🟢🌀🟣चंद्रपूर🟣🟩🟨किरण घाटे🟣🟪याेग प्राणायामांच्या माध्यमांतुन शरीर निराेगी राहु शकते असे प्रतिप्रादन चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार तसेच सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणां-या यंग चांदा ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांनी केले .🟣🌀🟩🟪ते आज रविवार दि.२४जानेवारीला सकाळी ७वाजता सरकार नगर समिपच्या गजानन महाराज मंदीर प्रांगणात शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित केलेल्या एका याेग शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बाेलत हाेते .🟨🟩🟪💠🛑🌀 याच प्रांगणात पतंजली याेगचे २०२०पासुन नियमीतपणे वर्ग सुरु असल्याचे याेग शिक्षिका शुभांगी डाेंगरवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातुन या वेळी सांगितले .🟪🟡🌀🟩🌀दरम्यान स्थानिक गजानन महाराज मंदीर ट्रस्टचे कोषाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात सदैव योगदान देणारे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक उल्हास करपे यांचे मागणीच्या अनुषंगाने चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांनी गजानन मंदीर परिसरात गट्टु लावण्यांसाठी पाच लाख मदत निधी देत असल्याचे या वेळी जाहीर केले.गजानन मंदीर परीसरात येत्या २४जानेवारी ते २८जानेवारी पर्यंत याेग शिबिर चालणार असुन आज रविवारी सकाळी पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन गजानन महाराज ट्रस्टचे लक्ष्मण धाेबे , नगर सेवक संदीप आवारी , जनार्धन स्वामी याेगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष नत्थुजी मत्ते पतंजलीच्या याेग शिक्षिका लता चाफले , स्मिता श्रीगडीवार , अर्पणा चिले , गजानन महाराज मंदीर प्रांगणात नियमित याेगा वर्ग घेणा-या चंद्रकला धाेबे , राजन सर , नागपूरे सर प्रामुख्याने उपस्थित हाेते .💠🟡🟡🛑🟩🌀🟪या वेळी शालेय विद्यार्थी आयुषसिंग , शुभम सरकार वेदांती फिरके , तनवी ठाेंबरे , संजीवनी गेडेकर यांनी उत्तम रित्या प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितीतांकडुन दाद मिळविली .🟡🟩🟣🌀🟪कार्यक्रम यशस्वि करण्यांसाठी यंग चांदा ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांसह शुभम डाेंगरवार संचिता शिंदे , माधुरी वाटेकर सविता ढाेणे व शुभम मडावी यांनी अथक परिश्रम घेतले .🟪🟨🌀🟡🟩🟢उपरोक्त कार्यक्रमाचे उत्तम व सुरेख संचालन शिक्षिका भुवनेश्वरी धर्मपुरीवार यांनी केले .सदरहु कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली हाेती .
