आवाळपुर ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांची बाजी

0
506

आवाळपुर ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांची बाजी

तालुक्यात दुसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आवाळपुर ग्रामपंचायत निकालकडे लागून होते तालुक्याचे लक्ष

शेतकरी संघटना, म.न से. गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी महायुतीचा विजय

आवाळपुर
नुकताच कोरपना तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून तालुक्यातील दुसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या 13 सदस्यीय आवाळपुर ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटना, म.न से. गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी च्या महायुती मध्ये असलेल्या महाग्राम विकास आघाडीचा विजय झाला असून आघाडीचा 9 उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे सात , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक व वंचित बहुजन आघाडीचा एक असे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. मागील पंचवार्षिक काळात सत्तेत असलेल्या काँग्रेस ला मात्र फक्त 4 जागेवर समाधान मानावे लागले.

युवकांनी मारली बाजी
आवाळपुर ग्रामपंचायत निवडुणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे पाच, काँग्रेसचे चार युवा उमेदवार विजयी झाले.

बाळकृष्ण काकडे यांचा तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय
संपूर्ण परिसराचे लक्ष लागलेल्या आवाळपुर वार्ड क्रमांक एक चा अत्यंत चुरशीचा लढतीत बाळकृष्ण कवडू काकडे यांनी अपक्ष उमेदवार लीलाधरजी चटप यांचा पराभव करीत 245 मतांनी विजय मिळविला. काकडे यांना 403 तर चटप यांना 158 मते मिळाली.
विजयी उमेदवारांमध्ये शेतकरी संघटनेचे विकास दिवे, बाळकृष्ण काकडे,कान्होबाजी भोंगळे, सुरेश दिवे, प्रियंकाताई दिवे, सुस्मिताताई पाणघाटे, नंदाताई सूर मनसे च्या स्वातीताई नगराळे , वंचित चे प्रकाश जीवने, यांनी विजय संपादित केला.

काँग्रेसच्या वतीने युवा उमेदवार कल्पतरू कन्नाके यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे उमेदवार संदीप पंधरे यांचा 146 मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला, एकता वानखेडे अविरोध निवडून आल्या तर शरदाताई मोहुर्ले, मनीषाताई कोट्टे यांनी विजय मिळविला.

एकूणच सध्यपरिस्थिती वरून ग्रामपंचायत आवाळपुर मध्ये शेतकरी संघटना आघाडीचा सत्ता स्थापनेचा प्रयत्न होताना दिसून येत असून काँग्रेस ला विरोधी बाकावर बसावे लागेल असे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here