उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वाढीव १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करा तसेच शासन निर्णयानुसार मानवसेवेचे रिक्त पदे त्वरित भरा – माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

0
614

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वाढीव १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करा तसेच शासन निर्णयानुसार मानवसेवेचे रिक्त पदे त्वरित भरा – माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली मागणी

हिंगणघाट, अनंता वायसे (१२ मे) उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट जि वर्धा येथे वाढीव १०० बेडचे कोविड सेंटर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार डॉक्टर, टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, महिला व पुरुष नर्स व इतर मानवसेवेचे रिक्तपदे त्वरित भरण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,आरोग्य मंत्री राजेश टोपे ,पालकमंत्री सुनील केदार ,जिल्हाधिकारी वर्धा, निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग असून रुग्णांची काळजी घेणे कठीण समस्या झाली आहे. नागपूर, अमरावती ,वर्धा व इतर जिल्ह्यात रुग्ण संख्या खूप मोठ्या प्रमाणात झाली असून रुग्णांना बेड उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनाने मृत्युमुखी पडण्याची रुग्ण संख्या वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली नसून सर्व स्तरावर प्रतिबंधात्मक उपयोजना करणे आवश्यक आहे लॉकडाऊन असताना सुद्धा कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही.
रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून ऑक्सिजनचे बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे रुग्णांना जीव घेण्या प्रसंगांना समोर जावे लागत आहे.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट हे नागपूर ते हैदराबाद रोडवर असून दोन्ही राज्यात ट्रक व इतर दळणवळणाची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात आहे. हिंगणघाट येथे ट्रामा केअर सेंटर आहे परंतु तिथे स्टाफ नसल्यामुळे ते बंद स्थितीत आहे.
केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून सरकारी दवाखान्यांना करोडो रुपयाचा निधी देऊन बांधले आहे. त्यात इमारत ,डॉक्टर, टेक्निशियन, ट्रामा केअर युनिट ,मशीन इत्यादी त्यात आहे. परंतु प्रशासनाचे नाकारते भूमिकेमुळे करोडो रुपयाचे शासकीय प्रोजेक्ट कागदोपत्री असून सेवा देण्यास असमर्थ आहे त्यामुळे कोरोना महामारीचा सामना करण्यास सरकारी व्यवस्था असमर्थ आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबाचे व समाजाचे कालचक्र बिघडले आहे. या कोरोनाच्या महामारीवर सर्वांना सहकार्य करून मात करावी लागणार आहे. प्रत्येक कुटुंबातील जीवन जगणे कठीण झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पादुर्भाव लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे १०० बेडचे कोविड केअर सेंटर उघडण्यात यावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार डॉक्टर टेक्निशियन मशीन ऑपरेटर महिला व पुरुष नर्स व इतर मानवसेवेची रिक्त पदे त्वरित भरून दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here