भद्रावती -पिपरी देशमुखचा पटवारी जगन जांभूळे अपघातात ठार

0
667

भद्रावती -पिपरी देशमुखचा पटवारी जगन जांभूळे अपघातात ठार

भद्रावती/चंद्रपूर, किरण घाटे : भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथील कार्यरत पटवारी जगन विष्णु जांभूळे( वय ५२वर्ष ) यांचा आज बुधवार दि.१२मे ला संध्याकाळी चंदनखेडा या गावा समिप अपघातात झाला .त्यातच त्यांची प्राणज्याेत मालवली असल्याचे व्रूत्त आहे .जांभूळे यांचे मुळ गांव राळेगांव असुन ते भद्रावती तालुक्यात काही वर्षापासून पटवारी म्हनुन कार्यरत हाेते.आज ते सांयकाळी आपली शासकीय कामे आटाेपून स्वताच्या दुचाकी वाहनाने भद्रावती वरुन (चंदनखेडा मार्गे) शेगांव येथे जात हाेते .परंतु याच मार्गावर रस्त्याचे व एका कँनलचे काम सुरु हाेते .रस्त्याची पुरेपुर कल्पना त्यांना न आल्यामुळे त्यांचे वाहन थेट खाेलगट खड्ड्यात शिरले त्यातच जगन जांभुळे यांचे डाेक्याला गंभीर मार लागला .काहीनी धावपळ करत जखमीला चंदनखेडा येथील प्राथमिक केन्द्रात दाखल केले .परंतु तेथील डाँक्टरने ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे हलविण्याचा सल्ला दिला .त्यांना वाहनाने भद्रावतीला आणत असतांनाच वाटेतच त्यांची प्राणज्याेत मालवली .सेवेतुन निवृत्त हाेण्यांस त्यांना बराच कालावधी शिल्लक हाेता .त्यांचे मागे पत्नी व तीन मुले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here