संविधान दिनी पूर्ण ताकतीने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरेल : खासदार बाळू धानोरकर

0
397

संविधान दिनी पूर्ण ताकतीने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरेल : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : देशभरात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, हे कळणे अत्‍यावश्यक आहे. ‘१९३३ साली इंग्रजांच्या कार्यकाळात जनगणना झाली होती, तेव्हा फक्‍त एकदाच ओबीसीची जणगणना करण्यात आली होती. तेव्हा देशात ५४ टक्के ओबीसी समाज असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. आरक्षण देताना त्‍याच्या अर्धे २७ टक्‍के आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात आले. मात्र, सध्या देशभरात ओबीसी समाज नेमका किती आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्‍ध नाही. केंद्र पातळीवर जितक्‍या समित्‍या नेमण्यात आल्‍या किंवा विविध न्यायालयात याच्याशी संबंधित जितके विषय आले, त्‍यामध्ये ओबीसी समाजाची आकडेवारी मागण्यात आली आहे. मात्र ती उपलब्‍ध नाही. आता सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी वेगळा रकाना नाही. तो असायला हवा. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे’, अशा इतर मागणीला घेऊन संविधान दिनी २६ तारखेला चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. त्यावेळी पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. ते वरोरा येथे ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, बळीराज धोटे, ऍड. दत्ता हजारे, ऍड. पुरूषोत्तम सातपुते, सूर्यकांत खनके, विजय बदखल, रमेश राजूरकर, नितीन मत्ते यांची उपस्थिती होती.

आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आजवर या समाजातील महिला कधीच रस्त्यावर उतरल्या नाही. परंतु २६ तारखेला संविधान दिनी रस्त्यावर उतरून पुरुषा प्रमाणे या लढयात आपली शक्ती दाखविणार आहे. संपूर्ण ओबीसी समाजातील महिलांनी ऐतिहासिक मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here