चंद्रपूर स्वातंत्र्य योद्धा बाबुराव शेडमाके यांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

158

चंद्रपूर स्वातंत्र्य योद्धा बाबुराव शेडमाके यांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

 

घुग्घुस : 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे ही मोठे योगदान आहे. येथील भूमिपुत्रांनी स्वातंत्र्या करिता हसतमुखाने आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.

क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांना इंग्रजांनी कटकारस्थान रचत धोक्यांनी अटक केली व चंद्रपूर येथील कारावसात त्यांना 21 ऑक्टोबर 1858 साली फासावर चढविण्यात आले.

त्यांचे हौतात्म्य येणाऱ्या पिढीला सदैव प्रेरणा देत असतात
काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने काँग्रेस नेते बालकिशन कुळसंगे, युवा नेते दिपक पेंदोर यांच्या हस्ते शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार,रोहित डाकूर,रफिक शेख,सुनील पाटील,अंकूश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

advt