कोरोनाने शिकविले आरोग्याचे महत्व कबड्डी हे काळाची गरज : राजूरेड्डी

0
336

कोरोनाने शिकविले आरोग्याचे महत्व कबड्डी हे काळाची गरज : राजूरेड्डी

तीन दिवसीय पुरुष कबड्डीचे भव्य उदघाटन सोहळा संपन्न

नकोडा : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरकार कमिटी तर्फे तीन दिवसीय पुरुषांचे कबड्डी सामने युथ चषक 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 पर्यंत आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन 26 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, ठाणेदार बबनराव पुसाटे,कामगार नेते सैय्यद अनवर,नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी उप – सरपंच हनिफ मोहम्मद शेख, शरीफ शेख, उपसरपंच मंगेश राजगडकर,संभा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात रेड्डी यांनी सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या काळात स्वास्थ राहण्या करीता कबड्डी सारखे आयोजन होणे हे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उदघाटन सोहळ्या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रेकॉर्डिंग नृत्य ही सादर करण्यात आले. वढा तसेच नकोडा या दोन चमूत शो मॅच घेण्यात आली यात नकोडा चमू विजयी झाला.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राकेश जेणेकर, बंडू बुच्चे,उत्तम ठाकरे,रोशन दंतालवर,रोहित डाकूर,सिनू गुडला,विजय माटला,माजी सैनिक बांदूरकर,राजू तिरणकार, व मांदाळे यांनी ही उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरकार कमिटीचे अध्यक्ष अल्ताफ शेख,जाहिद शेख,रोशन चिंचोलकर,निसार शेख व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. संचालन शंकर नागपुरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here