शेकडो युवकांनी रक्तसेवा पुरवत साजरा केला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस

0
540

शेकडो युवकांनी रक्तसेवा पुरवत साजरा केला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस

विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब करंजीचा उपक्रम

यंदा कोरोनाच्या संकटाने अवघे मानवी जीवन विस्कळीत झाले आहेे. अशावेळी सर्वसामान्यांना आधार देणे ही काळाची गरज आहे.रक्तदान ईश्वरीय कार्यच आहे.राज्याचे मदत पुनर्वसन ,बहुजन विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा भर राजकारणाशिवाय समाजकारणावर जास्त असतो आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब करंजी च्या सर्व कार्यकर्त्यांनी यंदाचे वर्ष सेवा वर्ष म्हणून राबविण्याचे ठरवले आहे.१२ डिसेंबर वाढदिवशी तालुक्यात विविध सेवाभावी कार्य आयोजन कार्यकर्त्यांनी केले.याच अनुषंगाने काँग्रेस चे जिल्हा सचिव कमलेश निंमगडे यांच्या मित्रावरीवाराच्या वतीने कर्तव्यतत्पर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमीत्य दिर्घायूची प्रार्थना रुग्णसेवेचे व्रत घेत रक्तदान शिबीर आयोजित करून करंजी सह तालुक्यातील शेकडो नागरिकांनी रक्तदान करत सेवाव्रत पूर्ण केले . यावेळी तहसीलदार के डी मेश्राम,बाजारसमिती सभापती सुरेश चौधरी,राजीवसिंह चंदेल, गौतम झाडे,गोंडपीपरी यंग ब्रिगेड अध्यक्ष सुरज माडुरवार,नगरसेक नीरज चपले, पत्रकार समीर निमगडे, चंद्रजित गव्हारे,अस्लम शेख,आशिष निमगडे,राजू झाडे,दिलीप गुरनूले, दिलीप वासेकर,संजय गांधी निराधार समिती सदस्य सचिन फुलझले,मुख्य आयोजक कमलेश निंमगडे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here