पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

0
658

पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

कांग्रेस कमेटि पोंभुर्णा चे आयोजन

पोंभुर्णा प्रतिनिधी:- पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने पोंभुर्णा येथील कांग्रेस कार्यालयात पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले.
सध्या कोरोणा या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे त्यामुळे रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्याच उद्देशाने नामदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोंभुर्णा कांग्रेस कमेटि च्या वतीने पोंभुर्णा येथील कांग्रेस कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले यात कांग्रेस कार्यकर्त्यांनी व युवा शिलेदारांनी स्वयंपुर्तीने रक्तदान केले.
या रक्तदान शिबीरामध्ये तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन रक्तदान केले.रक्तदान शिबीर च्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कवडु कुंदावार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अतिक कुरेशी, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष साईनाथ शिंदे, अशोक सिडाम, विनायक बुरांडे, मारोती धोटे,रुषी पोलेलवार, गणेश अर्जुनकार, निलकंठ नैताम, सोमेश्वर कुंदोजवार,शुभम वासेकर, हरिश्चंद्र दिवसे, रवि पेंदोर,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here