बंगाल येथील तृणमूल कांग्रेस विरोधात नारेबाजीने चामोर्शी शहर दणाणले

0
557

बंगाल येथील तृणमूल कांग्रेस विरोधात नारेबाजीने चामोर्शी शहर दणाणले

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर, कार्यकर्त्यांच्या घरावर व कार्यालयावर अमानवीय रीत्या द्वेषाच्या भावनेने होत असलेल्या खुनी हल्ल्यांचा व जाळपोळीचा जाहीर निषेध व्यक्त केला.पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर, कार्यकर्त्यांच्या घरावर व कार्यालयावर अमानवीय रीत्या द्वेषाच्या भावनेने होत असलेल्या खुनी हल्ल्यांचा व जाळपोळीचा जाहीर निषेध आज चामोर्शी येथील लक्ष्मी गेट चौकात आज भारतीय जनता पक्ष तालुका चामोर्शी व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने जाहीर निषेध करून बंगाल मधील व चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुद्धा निवेदन देण्यात आले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीपभाऊ चलाख भाजप तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे , भाजपा युवा नेते प्रतीक राठी , ज्येष्ठ नेते जयराम सावकार चलाख , राकेश भैसारे ,सुनील सावकार सोरते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here