कामगारांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही…!

0
817

कामगारांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही…!

जय भवानी कामगार संघटना, चंद्रपूर

 

चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पद्धतीने “चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळ” या संस्थेमार्फत काम करीत असलेल्या बगीचा सफाई कामगारांची मागील एक ते दोन वर्षापासून ३५ ते ३८ कामगार काम करीत असून देखील कंत्राटदार जाणीवपूर्वक हजेरी वर फक्त २४ ते २५ लोकांचीच हजेरी लावत असण्याचा प्रकार कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगितला. व याच बरोबर इतरही समस्या जसे कामगारांना शासनाने ठरविलेल्या किमान वेतनानुसार पगार न देणे नियमित पी-एफ व बोनस आणि पेमेंट स्लिप देखील दिले जात नसल्याने कामगाराची आर्थिक फसवणूक कंत्राटदाराकडून सातत्याने करण्यात येत होती. कामगारांनी यासंदर्भात कंत्राटदाराशी चर्चा केली असता कंत्राटदार उडवाउडवीचे उत्तर देत कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या संदर्भामध्ये कामगारांनी आवाज उचलल्यास त्यांचे तोंड बंद ठेवण्याकरिता कंत्राटदाराने कामगारांवर हुकूमशाहीचे फर्मान लादत बळजबरीने कंत्राटदारांनी बनवलेल्या करारनाम्यावर कामगारांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. व या कामगारांना कसल्याही प्रकारचे सूचना पत्र न देता अचानकपणे कामावरून काढून टाकण्याचा प्रकार कंत्राटदाराकडून करण्यात येत होता हा घडलेला सर्व प्रकार कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगताच श्री. सुरज ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून नेहमीप्रमाणेच या समस्त कामगारांवर होत असलेली पिळवणूक थांबवणे करिता संबंधित विभागांमध्ये तक्रार करून तात्काळ या कामगारांवर ती होणारा अन्याय दूर करण्यास सांगितले व आज दिनांक:- ०१/११/२०२१ रोजी संस्थापक अध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव श्री. राहुल चव्हाण यांनी समस्त कामगारांसह सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना कामगारांच्या समस्यांचे गांभीर्य सांगून तात्काळ कामगारांच्या सर्व समस्या मार्गी लावण्याकरिता विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here