आमदार समीरभाऊ कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यासाठी 10 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा तातडीने केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून वाढवून देण्याबाबतचे केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांना दिले निवेदन

0
442

आमदार समीरभाऊ कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यासाठी 10 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा तातडीने केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून वाढवून देण्याबाबतचे केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांना दिले निवेदन

हिंगणघाट, अनंता वायसे : कोरोनाकाळात सर्वत्र प्राणवायुची टंचाई निर्माण झाली असून यातून वर्धा जिल्हासुद्धा सुटला नाही. जिल्ह्यातील प्राणवायु म्हणजेच ऑक्सीजन साठयाची निकड पहाता हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दूरदृष्टिकोण बाळगत केंद्रीयमंत्री ना.नितीनजी गडकरी यांना १० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हयात सर्वत्र कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाबाधितांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सीजन वायु हा मोठा घटक आहे.यामुळे १० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा तातडीने केन्द्र सरकार कडुन किंवा राज्य सरकारकडुन वाढवून देण्याबाबत ना.नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. जिल्हयासाठी १६ मॅट्रिक टनाचा ऑक्सिजनचा कोटा हा ऑक्सिजनसाठा अतिशय अपुरा असा आहे. उपरोक्त १६ टन ऑक्सिजन साठा हा सावंगी(मेघे) रुग्णालयास व सेवाग्राम रुग्णालयासाठी आहे. हिंगणघाट, समुद्रपूर आणि आर्वी, वर्धा येथे खाजगी कोविड सुश्रुषागृहे उभारण्यात आली असुन ऑक्सिजन साठा उपलब्ध नसल्याने त्यांना कोरोनाबाधितांना सेवा देणे शक्य नाही.

ऑक्सीजन तूटवडयामुळे शेकडो कोरोनारुग्णाना वैद्यकीय यंत्रणा तयार असतांनासुद्धा ऑक्सिजनअभावी वंचित राहावे लागत आहे. अपुऱ्या ऑक्सिजनपुर्ततेमुळे आता जिल्ह्यात जिवितहानी होत आहे. जर ऑक्सिजन कोटा वाढवून दिला तर खाजगी रुग्णालयेसुध्दा तात्काळ सेवेत रूजू होऊन अश्या कठिणसमयी आपली सेवा देवू शकणार आहे.

अशा परिस्थितीत आमदार समिर कुणावार यांनी परिस्थितिचे गांभीर्य ओळखून ना. नितीनजी गडकरी यांचेकड़े अतिरिक्त १० टन ऑक्सिजन साठा वाढवून देण्याची मागणी केली असून सोबतच हिंगणघाट विधान सभेसाठी 20 Oxygen Concentrator देण्याची सुद्धा मागणी याप्रसंगी केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी साहेबांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here