ओबीसी समाज बांधवाची चामोर्शी तालुका स्तरावर बैठक संपन्न झाली

0
429

ओबीसी समाज बांधवाची चामोर्शी तालुका स्तरावर बैठक संपन्न झाली

ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय्य मागण्यांकरीता गडचिरोली जिल्हावासियांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या होणाऱ्या विशाल मोर्चामध्ये चामोर्शी तालुक्यातून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार नुकताच काल दि. 09/02/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता साधूबाबा कुटी येथे घेण्यात आलेल्या सभेमध्ये ओबीसी समाज बांधवानी केला आहे.
22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने नुकतीच चामोर्शी येथे ओबीसी समाज बांधवांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेमध्ये मोर्चाच्या प्रमुख मागण्या, समाज संघटन , मोर्चाच्या प्रवासाचे नियोजन मोर्चाची प्रचार प्रसिद्धी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागात गावा गावात जाऊन लोकांमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या प्रश्न , आरक्षण व नियोजित मोर्चाबाबद जाणीव जागृती करून चामोर्शी तालुक्यातून हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चात सहभागी करून घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी सातार साहेब , प्रा. दिनकर हिरदेवें, प्रा. बोरकुटे, प्रा. चौथाले, प्रा. इंगोले, बाळूपाटील दहेलकर, रविभाऊ बोमनवार, वैभव भिवापूरे, प्रा. रमेश बारसागडे, प्रा. घागरे, प्राचार्य बनपूरकर, आनंदराव लोंढे, प्रदीप पोटवार, विनोद खोबे, संतोष चावरे, राहुल नैताम, निकू नैताम, सुनील कावळे, लाडके साहेब, हेमंत आभारे, दिलीप चलाख, ललिंद्रा वासेकर, तुकाराम आभारे,देवानंद तुमडे, मनोहर दुधबावरे, एम जी दुधबावरे, प्रा. शेषराव येलेकर , विनायक बांदूरकर, राहुल मुनघाटे,रमेश कोठारे, भास्कर बुरे, पंकज खोबे आदी उपस्थित होते.
सभेला तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील विविध संघटनेचे, पक्षाचे ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here