माना टेकडी परिसरातील अवैध वृक्षतोडीला आळा घाला – माना भ्रमण मंडळाने केली मागणी!

0
557

माना टेकडी परिसरातील अवैध वृक्षतोडीला आळा घाला – माना भ्रमण मंडळाने केली मागणी!

🟩🟣🌀🌼चंद्रपूर🟣🟢🟡किरण घाटे🟣🛑☀️

🟩💠चंद्रपूर शहरालगत असलेल्या माना टेकडी परिसरात मोठया प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने या परिसरात शहरातील अनेक नागरिक भ्रमंतीसाठी येत आहेत. परंतू गेल्या काही महिन्यांपासून भिवापूर परिसरालगत मोठया प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने या परिसरातील निसर्गाची मोठया प्रमाणात हानी होत असल्याने याची दखल घेवून वृक्षतोडीवर आळा घालण्याची मागणी माना निसर्ग भ्रमंती मंडळाच्या वतीने अनुप चिवंडे यांनी केली आहे.
🟩🟣🌼🟡☀याबाबत भ्रमंती मंडळातर्फे देण्यांत आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माना टेकडी परिसरात मोठया प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने या परिसरातील निसर्गरम्य वातावरणात चंद्रपूर शहरातील नागरिक मोठया प्रमाणात भ्रमंती व व्यायाम करण्यांसाठी येत असतात. परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातील मोठया प्रमाणात वृक्षतोड हाेण्याचा प्रकार जाेरात सुरू अाहे .☀️🟩🟣🌼 मात्र याबाबत स्थानिक प्रशासन आणि वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. अश्याच प्रकारे मोठया प्रमाणात वृक्षतोड होत राहिल्यास या परिसराची रया गेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती भ्रमंती मंडळातर्फे वर्तवण्यात येवून या अवैध वृक्षतोडी विरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
☀️🟩🟣🌼या संदर्भात माना भ्रमंती मंडळातर्फे अनुप चिवंडे यांच्या नेतृत्वात वनविभाग आणि प्रशासनाला वृक्षतोडीला तातडीने आळा घालण्यासाठी या भागात नियमित गस्त घालणे आणि अवैध वृक्षतोड करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळात अनुप चिवंडे, विजय चहारे, सुशिल भागवत, प्रमोद आंबटकर, कालीदास वाटगुरे, आनंदराव लोनगाडगे, दिनेष शेलार, किशोर आकोजवार, राजू शास्त्रकार, देविदास तपासे, श्रीराम चहारे आदी माना भ्रमंती मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रशासनाने भ्रमंती मंडळाच्या मागणीची दखल घेवून अवैध वृक्षतोड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. चंद्रपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदुषण असल्याने शहरालगत असलेल्या या झाडी-झुडूपांचे  संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी असे एका प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे .एवढेच नाही तर या भागातील वृक्षतोडीला त्वरीत आळा घालावा अशी मागणी आता सर्वत्र होवू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here