15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

0
718

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्हाधिकारी यांचे आदेश

चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी :  राज्यात टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रतिबंधीत क्षेत्र वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेले विद्यापीठ व महाविद्यालयाचे वर्ग, वसतीगृह दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यास काल एका आदेशान्वये परवानगी दिली आहे.

यानुसार सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वसंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमीत वर्ग सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजीचे परिपत्रकातील मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारती दंड संहिता यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here