विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – प्रा. अशोक रणदिवे

0
431

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – प्रा. अशोक रणदिवे

ग्रामदर्शन विद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

माजी विद्यार्थी व पालक मेळावा

तालुका प्रतिनिधी/चिमूर

शालेय दशेतील विद्यार्थीच भविष्यात समाजच व देशाचं भविष्य घडविणारे व्यक्तिमत्त्व असतात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या संकल्पेनेतून ग्राम दर्शन शिक्षण मंडळाचे जनक व संस्थापक स्व.हरिभाऊ रणदिवे यांनी ग्रामदर्शन शिक्षण मंडळाची स्थापना केली. विद्यार्थ्यांचा आम्हाच्या माध्यमातून घडले. सामजिक योगदन म्हणून भविष्यात समाजपयोगी कार्य करनारे असे अनेक व्यक्तिमत्त्व निर्माण करू असं प्रतिपादन ग्रामदर्शन शिक्षण मंडळ,चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा.अशोक रणदिवे यानी केलं.ते ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे आयोजित सुवर्ण महोत्सव,माजी विद्यार्थी व पालक मेळावा व सांस्कृतिक महोत्सवात त्यांनी केलं.

या प्रसंगी ग्रामदर्शन शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डा. बाळकृष्ण बळवे, सचिव ऍड. वामन नन्नावरे, सहसचिव भाऊराव दांडेकर,प्राचार्य सदाशिव मेश्राम, गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट,सदस्य गीता बगळे,शुभांगी पोहेकर, केशव कारमॅंघे, गुणवंत मांडवकर,नंदलाल झाडे, डा. श्रीकांत रणदिवे, माजी विद्यार्थी इंजि.बाऊ राऊत,पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र रामटेके डा. सूर्यवंशी ,पुंडलिक मत्ते,अजहर शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी आगामी काळात ग्रामदर्शन शिक्षण मंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली.ज्या माजी विद्यार्थ्यांनि माजी शाळा म्हणून शाळेसाठी मदत केली त्यांचे व पालवर्गाचे आभार मानले.प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी शाळेच्या इतिहासाला उजळणी देत स्थापना वर्षाची पटसंख्या व आजची पटसंख्या याचे अवलोकन केलं तर आज पर्यत विविध राजकीय,शासकीय-निमशासकीयपदावर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांचा इतिहास त्यांनी अवगत करून दिला.तसेच त्यांनी आजपर्यंत न झालेल्या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की आपण जेव्हा केव्हा मूळगावी याल तेव्हा अवश्य माझी शाळा म्हणून शाळेला भेट द्या व आपले अनुभव विद्यार्थ्यांना द्या.

कार्यक्रमाची सुरुवात महामावांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.गजानन सातपुते यांनी केलं.तर प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी तन्वी गुर्ले तर आभार प्रा.बोरकर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षक दिलीप कोकाडे, संजय गिरडे,प्रकाश शेरकी, रासेकर,निखारे विद्यार्थी प्रतिनिधी विनीत नागोसे,प्रेम श्रीरामे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here