जिल्हा क्रीडा संकुलात आप चा हंगामा

0
556

जिल्हा क्रीडा संकुलात आप चा हंगामा

प्रवेश शुल्काचे बॅनर काढण्यात आले

नुकतेच दोन दिवसा अगोदर जिल्हा क्रीडा संकुलातील धावपट्टीचे इतर कामांचे लोकार्पनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला पण दोन दिवस होत नाही तर आपल्या विभागामार्फत जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश हवा असेल तर 500 रुपये द्यावे लागेल. फुटबॉल खेळायचे असेल तर एक लाख रुपये असा तुघलकी फर्मान असलेला बोर्ड लावण्यात आलेला आहे .पण प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्हा हा मानव विकास निर्देशकांच्या बाबतीत पिछाडीवर असून जिल्ह्यातील अनेक तालुके आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्याच्या मागासलेल्या तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये दररोज सरावासाठी येतात तसेच तापमान वाढ व प्रदूषणामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक सुद्धा आरोग्य जपण्यासाठी येतात मात्र खेळाडू व सामान्य नागरिकांकरिता मोठे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असे फलक लावल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच खेळाडू मध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे तरी आपणास विनंती करण्यात येते की हे लावण्यात आलेले प्रवेश शुल्काचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ईशारा युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यानी देत तात्काळ क्रीडा संकुलात लावण्यात आलेले प्रवेश शुल्काचे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे बॅनर काढण्यास भाग पाडले.

या आंदोलनात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, शहर सचिव राजू कूड़े , जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, युवा महानगर अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, सुनिल सादभया, योगेश गोखरे, सुधिर पाटिल, स्वप्निल घगरगुंडे, दिपक बेरशेट्टीवार, जितेन्द्र भाटिया, कृष्णा साहारे, गणेश बंसोड़, सुजित चेटगुलवार, मधुकर साखरकार, अशोक महूरकर तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here