लॉयड्स मेटल व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य,शैक्षणिक,महिला सक्षमीकरण,सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे,याच माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची सेवा व्हावी व नागरिकांना योग्य उपचार गावातच मिळावे यासाठी दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२४ ला उसगाव , म्हातारदेवी,शेणगाव, पांढरकवडा व नकोडा या ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिरात नेत्र तपासणी , कॅन्सर तपासणी, बीपी, शुगर अशा संपूर्ण रोगांची तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले.तसेच या आरोग्य तपासणीवेळी महिलांसाठी स्वतंत्र कक्ष व महिला डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य तपासणी साठी वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनच्या व्यवस्थापक कुमारी नम्रपाली गोंडाणे,प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव,ड्राॅ. कमलजित कौर,ग्रामपंचायत सरपंच सौ.निविता ठाकरे,संध्या पाटील,श्री.किरण बांदूरकर,सौ.पुष्पा मालेकर,श्री.सुरज तोतडे,अनुराग मत्ते hcg दवाखाना नागपूर चे अधिकारी व घुग्घुस परिसरातील गावातील ग्राम पंचायत कमिटी उपस्थित होते आरोग्य शिबिराची संपूर्ण माहिती कुमारी नम्रपाली गोंडाणे यांनी दिली तर आरोग्याची काळजी कशी घ्यायची कॅन्सर कसा रोखायचा याची संपूर्ण माहिती ड्राॅ. कमलजित कौर यांनी दिली यावेळी गावातील एकूण २४०० नागरिकांनी आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ.प्रिया पिंपळकर, सौ.ममता मोरे, सौ.लता बावणे,सौ.मनीषा बरडे, सौ अश्विनी खोब्रागडे, सौ.मंजुषा वडस्कर यांनी प्रयत्न केले.