एवरप्रेझेंस फाऊंडेशन तर्फे गरजूंना कपडे वाटून दिवाळी साजरी
चंद्रपूर । रोशन खोब्रागडे : आज दिवाळी निमित्त चंद्रपूरचे आराध्य दैवत आई महाकाली मातेचा आशीर्वाद घेऊन मंदिर परिसरातील तसेच चांदा क्लब ग्राउंड सामोरील बोबडतुल्लाशा दर्गा परिसरातील निराधार गोरगरिब लोकांना कपडे, फळ वाटून त्यांचे तोंड गोड करून दिवाळीच्या शुभेच्छा एवरप्रेझेंस फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आल्या.

यावेळी एवरप्रेझेंस संस्थापक अध्यक्ष रितीक बेतवार, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल नवघरे, वैभव बकारे (सर), यश होकम, अर्पिता बक्शी, सुबोध खरे, दिव्या एलपूलवार, निखिल काटोले, रोशन खोब्रागडे, दानिष खान, अद्नान शेख, मुर्तूझा शेख, आशिफ शेख, तुषार बेतवार, आलोक सिंग ठाकूर, क्रिष्णा बोरसर आदि मित्रपरिवार उपस्थित होता.