आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी कविता कन्नाके हत्या प्रकरण

0
824

आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी

कविता कन्नाके हत्या प्रकरण

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :- राज जुनघरे

मृतक कविता गंगाधर कनाके च्या मारेकऱ्यांना कोठारी पोलिसांनी 4 जुलै ला बल्लारपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 जुलै पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीचा काटा काढण्याचे मित्रांना सोबत घेऊन कट रचून ३० जून ला रात्री १० वा. पत्नीचा खून केला. व अपघात झाल्याची बतावनी करीत कोठारी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.या घटनेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मर्ग दाखल केला .तपासाअंती मृतक कविताच नवरा गंगाधर सीताराम कणाके (२८) त्याचे दोन साथीदार राजकुमार बाबुराव कनाके (२२) रा कोठारी,शंकर रामल्लू गधमवारं (२०) रा दहेली यांना खून प्रकरणात अटक केली आहे. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या कवितांच्या हत्याकांडाची संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी नातलगांनी केली आहे.
३०जून ला उमरी फाटा ते कवडजई रस्त्याचे पुलाजवळ रात्री १०वा चे दरम्यान गंगाधर कंनाके व त्याची गर्भवती पत्नी सविता चिमूर येथुन कोठारी येथे राहते घरी येत असताना रानटी डुक्कराने दुचाकीस धडक दिल्याने गाडीचा तोल जाऊन अपघात झाला.त्यामध्ये गंगाधर याची पत्नी ही मरण पावल्याची तक्रार पोलीस स्टेशन कोठारी येथे दाखल केली.तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला.मर्ग चौकशीमध्ये सदरचा अपघात नसून घातपात असल्याची शंका पोलिसांना आली.तसेच मृतकाचे नातेवाईकांनी सदर मृत्यूबाबत संशय व्यक्त केला.त्याप्रमाणे कोठारी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवून त्याबाबत प्राथमिक माहिती काढली असता मृतकाचा पती गंगाधर कनाके याचा महिलेशी आपसी संबंध होता.तिच्यासोबत एक वर्षांपासून घरात पत्नीसोबत राहत असल्याने सतत वाद,तंटे मृतक व गंगाधरशी होत होते.त्यास कंटाळून पत्नीचा काटा काढण्याचा गंगाधरने कट रचला त्यासाठी त्याने त्याचे मित्र शंकर रामलू गंधामवार (२०)रा दहेली ,राजकुमार बाबुराव कंनाके(२२) रा कोठारी यांना पैसे देण्याचे कबुल करून कट रचून अपघाताचा देखावा करून पत्नी कविता गंगाधर कंनाके(२३)हिला जीवानिशी ठार मारले.यावरून अपराध क्र १३२/२१कलाम ३०२ व इतर कलम अनवये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर खुनाचा तपास ठाणेदार तुषार चौव्हान करीत आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपिकडून खुनाच्या रहस्यांचा उलगडा होऊन हत्यामगिल खरे कारण पुढे येणार आहे.

गंगाधर चे साथीदार – आरोपी २. शंकर गंधमवार, आरोपी ३. राजकुमार कंन्नाके
मृतक कविता कन्नाकेमृतक कविता चा पती,  आरोपी १. गंगाधर कंन्नाके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here