कोरोना योध्दांचा सत्कार व राखी……

0
293

कोरोना योध्दांचा सत्कार व राखी……
भाजपा महिला आघाडीचा उपक्रम. …..

पोंभुर्णा:-
संपूर्ण देश व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना काळात पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, सफाई कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत. ते अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी योद्धा म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडी पोंभुर्णाच्‍या वतीने या वर्षी कोरोना संकटात जनतेच रक्षण करणारे पोलिस स्टेशन पोभुर्णा चे पोलिस बांधव, प्रा. आ केंद्र पोभुर्णा चे सर्व कर्मचारी व नगरपंचायतचे सफाई कर्मचारी यांना राखी बांधून आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करित मोजक्या महिलांच्या उपस्थितीत कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिति चे सभापती कु.अल्काताई आत्राम , नगराध्यक्ष श्वेताताई वनकर, उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी , नगर सेविका सुनिता मॅकलवार , भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष वैशाली बोलमवार ,  ठाणेदार नाईकवाड आणि सर्व पोलिस कर्मचारी,  तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. ममामीडवार व कर्मचारी, उमेदचे राजेश दुधे आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here