गरोदर मातांना बाळू पोषण आहार भेट देऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

0
571

गरोदर मातांना बाळू पोषण आहार भेट देऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

बाळू फौंडेशन सह सरल फौंडेशन बल्लारपूर तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार- राजेश बट्टे यांचे प्रतिपादन

सिंदेवाही पंचायत समिती चे विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतील बाळू पोषण आहार पंचायत समिती बल्लारपूर अंतर्गत बामणी येथे 4 गरोदर मातांना राजेश बट्टे यांचा तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्य साधून देण्यात आला प्रसंगी बामणी ग्रामपंचायत चे सरपंच सुभाष ताजने, ग्राम विकास अधिकारी शेंडे,सुपरवायझर गोटेवार मॅडम,बाळू चे अक्षय सुर्तेकर ,अंगणवाडी सेविका ,व इतर महिला उपस्थित होत्या. बाळू फौंडेशन सोबत बट्टे यांची सरल फौंडेशन संस्था संपुर्ण बल्लारपूर तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असे राजेश बट्टे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नामांकित संस्थेने बाळू च्या माध्यमातून कुपोषण मुक्ती साठी प्रयत्न करावे करीता सर्वोपतरी सहकार्य करणार – अमित महाजनवार यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here