समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून तेली बांधवानी एकत्र यावे – प्रा. सूर्यकांत खनके यांचे आवाहन

0
528
समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून तेली बांधवानी एकत्र यावे – प्रा. सूर्यकांत खनके यांचे आवाहन
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेली समाज बांधव आहेत. परंतु मागील तीन दशकापासून जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात तेली समाज बांधवाला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आता समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तेली बांधवानी एकत्र येऊन सक्रिय राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन तेली समाजाचे जेष्ठ नेते प्रा. सूर्यकांत खनके यांनी केले. काल तेली समाज बांधवानी आयोजित केलेल्या चिंतन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी समाज बांधव प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, अजय वैरागडे, प्रा. बेले, प्रा. वरंभे  गोविल मेहरकुरे, शैलेश जुमडे, निलेश बेलखंडे, नितेश जुमडे, शेखर वाढई, जितू इटनकर, राजेंद्र रघाताटे, रवी लोणकर, विनोद कावडे, अनिल आंबोरकर यांची उपस्थिती होती.
समाजाचा विकास हाच तेली समाज बांधवांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजेत.  समाज बांधवांनी एकमेकासाठी तेली समाजाची ताकत उभी केली पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन प्रकाश देवतळे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
राजकारणामध्ये तेली समाजाने तेली समाजालाच पाठिंबा दिला पाहिजे, तेव्हाच राजकारण तेली समाज मोठा होऊ शकतो. आजही संपूर्ण तेली समाज बांधवांचे एकत्रीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गोविल मेहरकुरे यांनी केले. यासह अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here