कोरोना मुळे  मृत्यू झालेले पत्रकाराच्या कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदतीची मागणी 

0
410

कोरोना मुळे  मृत्यू झालेले पत्रकाराच्या कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदतीची मागणी 
——————————————————————

——————————
पोंभूर्णा :  कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना ५० लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघ तालुका पोंभूर्णा यांनी मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांचे मार्फतीने दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
बिड जिल्ह्य़ातील गेवराई येथील दै. सामना चे तालुका प्रतिनिधी संतोष भोसले यांचे कोरोना च्या भितीमुळे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तसेच लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचे कोरोना मुळे निधन झाल्याची माहिती पुरोगामी पत्रकार संघाला प्राप्त झाली आहे.
या दोन्ही पत्रकारांच्या दुखद निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर आघात पोहचला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मृत्यू पत्रकारांच्या  कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रूपये आर्थिक मदत करावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघातर्फे मागणी केलेली आहे. पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन देताना पुरोगामी पत्रकार संघ पोंभूर्णा तालुका अध्यक्ष सुरेश कोमावार, जिल्हा संघटक रूपेश निमसरकार, जवाहर धोडरे, अविनाश वाळके, विजय वासेकर, विजय ढोंगे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here