साठ रुपये किमतीचे ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकले

0
434

साठ रुपये किमतीचे ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकले

जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील मेडिकलला ठोकले सील

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई, मेडीकल दुकानदारामध्ये हडकंप

 

 

साठ रुपये किमतीचे कटल ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकणाऱ्या मेडिकल स्टोरच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोका चौकशी करून या मेडिकलला सील ठोकण्यात आले आहे.

चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डोळ्याचे ऑपरेशनसाठी जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. शस्त्रक्रियेसाठी कटल ब्लेड ची गरज भासते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते खासगी मेडिकल मधून विकत घेतले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात पुरेसा औषध साठा असताना देखील बाहेर असलेल्या श्रीजी मेडिकल मधूनच हे ब्लेड विकत घेण्यासंदर्भात डॉक्टरांचा कमीशनखोरी करीता हट्ट असतो. डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर संचालकांनी साटेलोटे करून साठ रुपये किमतीचे हे ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकण्याचा सपाटा लावला होता. आतापर्यंत जवळपास हजारो रुग्णांनी सदर ब्लेड विकत घेतले.

रुग्णांकडून दहा पटीने अवैध पद्धतीने आर्थिक लूट करण्यात येत असल्याची बाब आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या लक्षात आली. त्यांनी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार आज लगेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी श्री. डांगे यांनी सर्वात समक्ष मोका चौकशी केली. आम आदमी पार्टीने या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील कळविले होते. आज झालेल्या चार ते पाच तास चाललेल्या चौकशी दरम्यान 60 रू किमतीचे ब्लेड सहाशे रुपयांना विकत असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत घडला आणि तो उघड झाला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने श्रीजी मेडिकलला सील लावण्याची कारवाई केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करण्याचा हा प्रकार आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उघड झाला आहे.

आर्थिक फसवणूक करणाऱ्या मेडीकल संचालक तसेच मीलीभगत असणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या डाॅक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली आहे.

यावेळी यावेळेस जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, शहर सचिव राजू कूड़े, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, झोन 1 अध्यक्ष सुनिल सदभय्या, झोन 2 अध्यक्ष रहेमान खान ,अल्पसंख्याक अध्यक्ष अश्रफ सय्यद, महेश सिंह प, पवन प्रसाद , योगेश गोखरे , सुभाष दुर्योधन तथा इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here